Indoor Plants: बेडरूमपासून हॉलपर्यंत घर सजवायचंय? 'ही' 7 इनडोअर रोपं लावा, घर दिसेल सुंदर आणि वातावरणही राहील प्रसन्न

Sameer Amunekar

मनी प्लांट

घराच्या कोपऱ्यात किंवा खिडकीजवळ मनी प्लांट ठेवा. याची हिरवीगार पाने घराला आकर्षक लुक देतात. हँगिंग पॉटमध्येही हे रोप छान दिसते.

Indoor Plants for Home | Dainik Gomantak

स्नेक प्लांट

कमी जागेत ठेवण्यासाठी स्नेक प्लांट उत्तम पर्याय आहे. याची उभी, आकर्षक पाने घराच्या सजावटीत भर घालतात आणि याची देखभालही सोपी असते.

Indoor Plants for Home | Dainik Gomantak

स्पायडर प्लांट

लांब, हिरवी-पांढरी पाने असलेले स्पायडर प्लांट टेबल, शेल्फ किंवा खिडकीजवळ ठेवता येते. छोट्या घरातही हे रोप सुंदर दिसते.

Indoor Plants for Home | Dainik Gomantak

पीस लिली

पांढऱ्या फुलांमुळे पीस लिली घराला शांत आणि सुंदर लुक देते. अप्रत्यक्ष प्रकाश असलेल्या जागेत हे रोप चांगले वाढू शकते. मात्र, हे पाळीव प्राण्यांसाठी विषारी ठरू शकते.

Indoor Plants for Home | Dainik Gomantak

अरेका पाम

घरात हिरवळ आणि नैसर्गिक सजावटीचा अनुभव हवा असेल, तर अरेका पाम निवडा. हॉलच्या कोपऱ्यात किंवा बाल्कनीत हे रोप आकर्षक दिसते.

Indoor Plants for Home | Dainik Gomantak

अ‍ॅलोवेरा

अ‍ॅलोवेरा हे कमी देखभालीत वाढणारे रोप आहे. याला भरपूर अप्रत्यक्ष प्रकाश किंवा योग्य सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. छोट्या कुंडीतही ते छान वाढते.

Indoor Plants for Home | Dainik Gomantak

जेड प्लांट

छोटी, मांसल हिरवी पाने असलेले जेड प्लांट टेबल, खिडकी किंवा ऑफिस डेस्कवर ठेवता येते. कमी जागेत सुंदर सजावट करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Indoor Plants for Home | Dainik Gomantak

फिट राहायचंय, वजनही कमी करायचंय; पण व्यायामाची सुरुवात कशी करावी? या Pro टिप्स ठरतील फायदेशीर

येथे क्लिक करा