Konkan Achara Beach: स्वच्छता, शांतता आणि शुद्ध हवा; निसर्गप्रेमींसाठी कोकणातील आचरा समुद्रकिनारा आहे नंदनवन

Sameer Amunekar

मालवण

कोकणात शांत, सुंदर आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा अनुभवायचा असेल तर मालवण तालुक्यातील आचरा समुद्रकिनारा एक उत्तम पर्याय आहे.

Konkan Achara Beach | Dainik Gomantak

पांढऱ्या शुभ्र वाळूचा किनारा

कमी पर्यटक, स्वच्छ परिसर आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा हा किनारा एकांत शोधणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे.

Konkan Achara Beach | Dainik Gomantak

कमी गर्दी

येथे कोणत्याही प्रकारच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज किंवा बोट राईड उपलब्ध नसल्याने गर्दी फारच कमी असते.

Konkan Achara Beach | Dainik Gomantak

शंख, शिंपले

किनाऱ्यावर विविध प्रकारचे शंख, शिंपले मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, जे पर्यटकांना खास आकर्षित करतात.

Konkan Achara Beach | Dainik Gomantak

निवांतपणा 

आचरा समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला नितांत शांतता आणि निवांतपणा अनुभवायला मिळतो.

Konkan Achara Beach | Dainik Gomantak

जामदुल बेट

आचऱ्याच्या बाजूलाच खाडी आणि समुद्र यांच्या संगमामुळे तयार झालेले जामदुल बेट हे येथील खास वैशिष्ट्य आहे.

Konkan Achara Beach | Dainik Gomantak

हिरवागार परिसर

जामदुल बेटाकडे जाण्यासाठी पूल बांधलेला असून, आजूबाजूला उंचच उंच नारळाची झाडे आणि हिरवागार परिसर मन प्रसन्न करून टाकतो.

Konkan Achara Beach | Dainik Gomantak

नागावच्या रुपेरी वाळूत आणि सुरूच्या बनात हरवून जाल

Raigad Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा