Konkan Tourism: कोकणची खरी शान! सिंधुदुर्गातील 'या' 7 पर्यटन स्थळांनी पर्यटकांना लावलंय वेड

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग किल्ला (मालवण)

सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे प्रतीक आहे. किल्ल्याचे भक्कम तट आणि महाराजांच्या हाताच्या व पायाच्या ठशांची मंदिरे आजही पर्यटकांना थक्क करतात.

Konkan Tourism | Dainik Gomantak

तारकर्ली समुद्रकिनारा

तारकर्ली त्याच्या पारदर्शक पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा आनंद घेऊ शकता. इथल्या 'हाऊस बोट'मधील मुक्काम म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो.

Konkan Tourism | Dainik Gomantak

विजयदुर्ग किल्ला

हा कोकणातील सर्वात जुना आणि अभेद्य जलदुर्ग मानला जातो. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या किल्ल्याचे स्थापत्यशास्त्र आजही संशोधनाचा विषय आहे. 'घेरिया' म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला शिवकालीन आरमाराचे मुख्य केंद्र होते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

आंबोली घाट आणि धबधबा

सिंधुदुर्गचे 'महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाणारे आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील धबधबे आणि धुक्याची चादर पर्यटकांना भुरळ घालते. जैवविविधतेच्या दृष्टीने हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे.

Konkan Tourism | Dainik Gomantak

देवगडचा समुद्रकिनारा आणि आंबा

देवगडचा समुद्रकिनारा अत्यंत स्वच्छ आणि शांत आहे. येथील 'विंड मिल्स' (पवनचक्क्या) आणि जुना किल्ला पाहण्यासारखा आहे. तसेच, जगप्रसिद्ध हापूस आंबा चाखण्यासाठी देवगडला पर्याय नाही.

Konkan Tourism | Dainik Gomantak

कुणकेश्वर मंदिर

याला 'कोकणची काशी' म्हटले जाते. अरबी समुद्राच्या अगदी काठावर असलेले हे महादेवाचे मंदिर आपल्या भव्य कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगररांगा असे विलोभनीय दृश्य येथे दिसते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

सावंतवाडी राजवाडा, मोती तलाव

सावंतवाडी हे शहर त्याच्या लाकडी खेळण्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथील 'राजवाडा' आणि त्यासमोर असलेला 'मोती तलाव' शहराच्या सौंदर्यात भर घालतात. येथील स्थानिक बाजारपेठेत मिळणारी हस्तकला पाहण्यासारखी असते.

Konkan Tourism | Dainik Gomantak

उन्हाळ्यात वर्कआऊटसाठी 'ही' वेळ आहे सर्वात बेस्ट

Workout Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा