Sameer Amunekar
कोकणात होळीला ‘शिमगा’ म्हणतात. हा सण फक्त होलिका दहन किंवा रंगपंचमीपुरता मर्यादित नसून, तो परंपरा, श्रद्धा आणि लोकसंस्कृतीचा मोठा उत्सव असतो. संकासुर विशेष लक्ष वेधून घेतो.
होळीच्या काळात गावागावातून ग्रामदेवतेची पालखी निघते. ढोल-ताशांच्या गजरात निघणारी ही पालखी पाहण्यासाठी देश-विदेशातून भाविक कोकणात येतात.
शिमग्याच्या दिवसांत ग्रामदेवतेची पालखी गावातील प्रत्येक घरात नेली जाते. देव घरात येतो, हे कोकणात ‘देव पाहुणचाराला येतो’ असे मानले जाते.
ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद प्रत्येक घरात वेगळ्याच स्वरूपाचा असतो. घर स्वच्छ करून, रांगोळी काढून देवाचे स्वागत केले जाते.
पालखी आल्यानंतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून ग्रामदेवतेची विधिवत पूजा केली जाते. हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी भावनिक आणि भक्तीपूर्ण असतो.
घरातील महिला मोठ्या आस्थेने ग्रामदेवतेची ओटी भरतात. ही परंपरा कोकणातील शिमग्याला खास वेगळेपण देते.
संपूर्ण गावात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यानंतर पालखी नाचवली जाते. ढोल-ताशांच्या तालावर होणारा हा उत्साहवर्धक कार्यक्रम म्हणजे शिमग्याचा कळस असतो.