Sameer Amunekar
रत्नागिरी जिल्ह्यातील जांभरुण हे गाव निसर्गाने अक्षरशः वेढलेले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा या गावाभोवती आहेत आणि यामुळे इथे नेहमीच थंडावा जाणवतो.
जांभरुण गावातील काही मंदिरे खासगी स्वरूपाची असून त्यांचा इतिहास तब्बल पाचशे वर्षांहून अधिक जुना आहे. या मंदिरे आजही ग्रामस्थांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत.
या गावातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे डोंगरातून येणारे नितळ पाणी. हे पाणी २४ तास अखंड खळाळत वाहते कोणत्याही पंपाशिवाय.
गावातील बहुतेक घरे या नैसर्गिक पाण्याच्या पाटांवरच बांधलेली आहेत. घरातच झऱ्याचे पाणी उपलब्ध असणे ही एक अनोखी बाब आहे.
या नैसर्गिक झऱ्यांमुळे अनेक पिढ्यांचं जीवन सुखकर झालं आहे. आजही पिण्याचे पाणी, अंघोळ, कपडे धुणे यासाठी गावकरी याच पाट्यांवर अवलंबून आहेत.
सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये वसलेले जांभरुण हे गाव शांत, हिरवेगार आणि हवामानाने समृद्ध आहे. निसर्गप्रेमींसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.
येथील घरांची रचना प्राचीन काळापासून जांभ्या दगडांनी केली जाते. ही रचना गावाला एक खास कोकणी सौंदर्य प्रदान करते.