Sameer Amunekar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली येथील नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड सध्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहेत.
सध्या वातावरण थंड असल्याने गरम पाण्याच्या या कुंडात स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत.
कुंड आरवली गावात नैसर्गिकरीत्या तयार झालंय.
पाण्यात औषधी गुणधर्म असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. पाण्यात स्नान केल्याने त्वचारोग, सांधेदुखी, पोटाचे त्रास आणि थकवा कमी होतो, असं गावकरी सांगतात.
आरवली येथील हे कुंड आरोग्य पर्यटनासाठी आदर्श ठरत आहेत. अनेक पर्यटक फक्त या गरम पाण्याचा अनुभव घेण्यासाठी येथे येतात.
हि कुंड ब्रीटिशकाळात मुंबई गोवा रस्त्याचे काम करत असताना सापडली असं सांगितलं जातं.
आरवली गरम पाण्याचे कुंड अंदाजे ११४ वर्ष जुनी आहेत .