Konkan Famous Beach: कोकणचा कॅलिफोर्निया! सिंधुदुर्गातल्या 'या' बीचवर विदेशी पर्यटकांची वर्षभर असते गर्दी

Sameer Amunekar

गोवा सीमेचे सान्निध्य

शिरोडा हे गाव गोवा-महाराष्ट्र सीमेवर वसलेले आहे. गोवापासून हा किनारा अगदी जवळ असल्याने, गोव्यात येणारे विदेशी पर्यटक शांततेच्या शोधात सहजपणे शिरोड्याला पसंती देतात.

Konkan Famous Beach | Dainik Gomantak

निसर्गरम्य, शांत वातावरण

शिरोडा बीचवर लांबच लांब पसरलेली पांढरी वाळू, स्वच्छ पाणी आणि किनाऱ्यावरील सुरूची झाडे विदेशी पर्यटकांना 'प्रायव्हेट बीच'चा अनुभव देतात.

Konkan Famous Beach | Dainik Gomantak

'व्हिलेज टुरिझम'चा अनुभव

विदेशी पर्यटकांना कोकणी संस्कृती आणि ग्रामीण जीवन जवळून अनुभवता येते. येथील स्थानिक होमस्टे आणि कौलारू घरांमध्ये राहून अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद घेणे त्यांना विशेष आवडते.

Konkan Famous Beach | Dainik Gomantak

स्वस्त आणि परवडणारे पर्याय

शिरोड्यातील निवास व्यवस्था आणि खाद्यपदार्थ अधिक परवडणारे आहेत. कमी खर्चात जास्त काळ राहण्याची सोय असल्यामुळे 'बॅकपॅकर्स' आणि दीर्घकाळ मुक्कासाला येणाऱ्या पर्यटकांची येथे गर्दी असते.

Konkan Famous Beach | Dainik Gomantak

ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व

शिरोडा येथील जुन्या मंदिरांची वास्तुकला पाहण्यात विदेशी पर्यटकांना विशेष रस असतो.

Konkan Famous Beach | Dainik Gomantak

योगा, ध्यानासाठी उत्तम ठिकाण

शिरोड्याचा किनारा अत्यंत शांत असल्याने अनेक विदेशी पर्यटक येथे योगासने आणि ध्यानधारणा करण्यासाठी येतात. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे त्यांच्यासाठी 'स्ट्रेस बस्टर' ठरते.

Konkan Famous Beach | Dainik Gomantak

जवळील पर्यटन स्थळांची जोड

शिरोड्याला लागूनच आरोंदा बॅकवॉटर, रेडीचा गणपती आणि यशवंतगड किल्ला यांसारखी ठिकाणे आहेत. एकाच ट्रिपमध्ये निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम मिळत असल्याने पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

Konkan Famous Beach | Dainik Gomantak

स्वराज्याचा 'तिजोरी' गड! सुरतेच्या अफाट खजिन्याचा रक्षक

Lohagad Fort Surat Loot Treasure | Dainik Gomantak
येथे क्लिक करा