Sameer Amunekar
कोकण म्हणजेच संस्कृती, परंपरा, निसर्गसौंदर्य आणि कलागुण यांचं एक सुंदर मिश्रण. या मातीतून अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पडद्यावर उमटवली आहे.
त्यातलं एक नाव म्हणजे तन्वी मुंडले (Tanvi Mundle). सुंदर आणि देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे तसेच सहजसुंदर अभिनयामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
तन्वी मुंडले ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आहे. कोकणातील साध्या घरातून आणि छोट्या गावातून तिने अभिनयाच्या विश्वात पाऊल टाकलं.
आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अभिनयातील समर्पणामुळे तिने छोट्या पडद्यावर ठसा उमटवला आहे.
शालेय व महाविद्यालयीन जीवनात विविध एकांकिका, नाटकांमधून तिच्या अभिनयाला चांगली दाद मिळाली. त्यानंतर तिने मालिका या माध्यमाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
तन्वी मुंडलेला खरी लोकप्रियता मिळाली ती झी मराठीवरील ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेमुळे.