Manish Jadhav
कुलाबा किल्ला हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून निवडला होता.
शिवाजी महाराजांनी 1680 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरु केले. किल्ल्याची रणनीती आणि स्थान अतिशय महत्त्वाचे होते. या ठिकाणाहूनच अरबी समुद्रातील हालचालींवर नियंत्रण ठेवता येत होते.
हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असून भरती-ओहोटीच्या वेळी किनाऱ्यापासून वेगळा होतो. भरतीच्या वेळी किल्ल्याकडे जाणे कठीण होते, तर ओहोटीच्या वेळी पायी चालत जाता येते.
महाराजांच्या निधनानंतर या किल्ल्याची जबाबदारी त्यांच्या आरमाराचे प्रमुख सरदार कानोजी आंग्रे (Sardar Kanoji Angre) यांच्याकडे होती. त्यांनी ब्रिटिशांना आणि पोर्तुगीजांना अनेक वेळा तोंड दिले.
कुलाबा किल्ल्याच्या मजबूत तटबंदीमुळे आणि 30 फुटांपर्यंतच्या उंच भिंतींमुळे तो शत्रूंसाठी अभेद्य होता. या किल्ल्यात गोड्या पाण्याचे तलाव आजही आहेत, जे त्या काळातील स्थापत्यशास्त्र दर्शवतात.
किल्ल्याच्या आतमध्ये काही मंदिरे आणि ऐतिहासिक इमारतींचे अवशेष आजही दिसतात. यात सिद्धिविनायक मंदिर आणि हनुमान मंदिर प्रमुख आहेत.
शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली असली, तरी त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे बांधकाम पूर्ण केले.
हा किल्ला केवळ एक संरक्षणात्मक किल्ला नव्हता, तर मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता. येथूनच अरबी समुद्रातील व्यापारावर नियंत्रण ठेवले जात होते.