Manish Jadhav
इंग्लंड दौऱ्यावर भारताचा सलामीवीर केएल राहुल (K.L. Rahul) याने अप्रतिम कामगिरी केली. त्याने या दौऱ्यात एकूण 532 धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
ओव्हल कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये राहुल फलंदाजीत फारशी कमाल करु शकला नाही, पण त्याने क्षेत्ररक्षणात (Fielding) मात्र मोठा विक्रम केला.
केएल राहुल आता इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक कॅच पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने या बाबतीत विराट कोहलीला मागे सोडले.
राहुलने इंग्लंडविरुद्धच्या 18 कसोटी सामन्यांमधील 33 डावांमध्ये क्षेत्ररक्षण करताना एकूण 26 कॅच पकडले.
या यादीत भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर 35 कॅचसह पहिल्या क्रमांकावर आहेत, तर राहुल द्रविड 30 कॅचसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 25 कॅच पकडले आहेत, त्यामुळे राहुल आता त्याच्या पुढे आहे.
या दौऱ्यात राहुलने 5 कसोटी सामन्यांच्या 10 डावांमध्ये 53.20 च्या सरासरीने 532 धावा केल्या. हे त्याच्यासाठी एक महत्त्वाचे प्रदर्शन आहे.
राहुलने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 18 कसोटी सामन्यांच्या 34 डावांमध्ये 43.73 च्या सरासरीने एकूण 1487 धावा केल्या आहेत. यात 5 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.