Sameer Amunekar
शिरोडा बीचचे पाणी स्वच्छ, निळसर आणि शांत आहे. त्यामुळे समुद्रस्नानासाठी हा किनारा सुरक्षित आणि आनंददायी मानला जातो.
इतर लोकप्रिय बीचच्या तुलनेत येथे तुलनेने कमी गर्दी असते. त्यामुळे कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत निवांत वेळ घालवता येतो.
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील रंगांची उधळण पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. फोटोग्राफीसाठी हा क्षण खास ठरतो.
लांबच लांब पसरलेली सोनेरी वाळू आणि नारळांच्या झाडांची रांग यामुळे हा किनारा अधिकच आकर्षक दिसतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा गावाजवळ असलेला हा बीच रस्त्याने सहज गाठता येतो. कुटुंबीय सहलीसाठी उत्तम पर्याय.
किनाऱ्यावर शंख-शिंपले, स्वच्छ हवा आणि समुद्राच्या लाटांचा मधुर आवाज निसर्गाचा खरा आनंद येथे अनुभवता येतो.
शिरोडा परिसरात इतरही सुंदर समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. त्यामुळे एक दिवसाची नाही तर पूर्ण विकेंड ट्रिप प्लॅन करता येते.