हॉटेलमधून चेकआउट करताना 'या' वस्तूंवर तुमचाच हक्क, जाणून घ्या काय-काय घेऊ शकता

Sameer Amunekar

बाथरूम अ‍ॅक्सेसरीज

हॉटेलमधील बाथरूममध्ये अनेक अ‍ॅक्सेसरीज ठेवलेल्या असतात. हॉटेलमध्ये राहायला येतात त्यांच्या सोयीसाठी त्यात काही वस्तू अशा असतात ज्या आपण घेऊ शकतो, तर काही फक्त वापरण्यापुरत्या असतात आणि त्या खोलीतच ठेवाव्यात.

Hotel Stay Checkout Tips | Dainik Gomantak

चप्पल

बहुतेक हॉटेल्समध्ये दिल्या जाणाऱ्या बाथरूम चप्पल्स डिस्पोजेबल (एकवेळ वापरण्यायोग्य) असतात. त्या पाहुण्यांसाठीच ठेवलेल्या असतात आणि पुन्हा वापरल्या जात नाहीत. म्हणून अशा चप्पल्स तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.

Hotel Stay Checkout Tips | Dainik Gomantak

स्टेशनरी वस्तू

हॉटेलमध्ये राहताना पाहुण्यांना अनेक वेळा स्टेशनरी वस्तूही दिल्या जातात, विशेषतः व्यावसायिक प्रवाशांसाठी किंवा कॉन्फरन्ससाठी. पण चेकआउट करताना यामध्ये कोणत्या वस्तू तुम्ही घेऊ शकता

Hotel Stay Checkout Tips | Dainik Gomantak

चहा, कॉफी पॅकेट

हॉटेलमध्ये राहिल्यानंतर चेकआउट करताना चहा, कॉफी आणि मसाले घेण्याबाबत बरेच लोकांना प्रश्न असतो. या वस्तू तुम्हाला घेण्याचा अधिकार आहे.

Hotel Stay Checkout Tips | Dainik Gomantak

शिवणकामाचे सामान

हॉटेलमध्ये छोट्या पॅकेटमध्ये शिवणकामाचे सामान (सुई, धागा, बटन) पाहुण्यांसाठी दिलेले असते. हे एकदाच वापरायचे असते आणि तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. शॉवर कॅप सुद्धा एकदा वापरण्यायोग्य वस्तू असल्याने ती सहज घेता येते.

Hotel Stay Checkout Tips | Dainik Gomantak

हॉटेलच्या मालकीच्या वस्तू घेणे टाळा

या सर्व वस्तू पाहुण्यांसाठी वापरासाठीच ठेवलेली असतात आणि तुम्ही नक्कीच घरी नेऊ शकता. मात्र, मोठे टॉवेल्स, बेडशीट्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर किंवा हॉटेलच्या मालकीच्या इतर वस्तू घेणे टाळा.

Hotel Stay Checkout Tips | Dainik Gomantak
Children Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा