Manish Jadhav
गोव्याचं निसर्ग सौंदर्य मनमोहित करतं. पर्यटकांना मोहिनी घालणारे गोव्यात अनेक समुद्रकिनारे आहेत.
गोव्यात अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांसोबत काही सिक्रेट समुद्रकिनारेही आहे. आज आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून अशाच एका समुद्रकिनाऱ्याविषयी जाणून घेणार आहोत.
गोव्यात गेलात तर केवळ प्रसिद्ध-ऐकलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नका. काही असेही सीक्रेट किंवा लोकांना फार कमी माहीत असलेले समुद्रकिनारे इथे आहेत. कारण या ठिकाणांवर तुम्ही निसर्गाचं सौंदर्य बघू शकता.
बेतूल बीच पणजीपासून जवळपास 50 किमी अंतरावर आहे.
इथे तुम्ही बसने जाऊ शकता. याशिवाय, प्रायव्हेट टॅक्सीही तुम्हाला मिळेल. इथे स्वादिष्ट सीफूड खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल बेतूल समुद्रकिनारा नक्की पाहा.