दैनिक गोमन्तक
28 नोव्हेंबर हा मंगळ ग्रह दिवस आहे. पृथ्वीनंतर ज्या ग्रहावर सर्वात जास्त शोधले गेले आहेत तो ग्रह म्हणजे मंगळ होय.
पृथ्वी आणि मंगळ ग्रहावर अनेक समान गोष्टी आहेत. मात्र पृथ्वीच्या तुलनेत मंगळ लहान आकाराचा आहे.
मंगळ ग्रहाला लाल ग्रह असेही म्हटले जाते.
पृथ्वीप्रमाणेच मंगळावर दऱ्या-डोंगर, ऋतु, बर्फ आढळतो.
सूर्यापासून चौथ्या क्रमांकावर असलेल्या या ग्रहावर वातावरण विरळ असते. त्यामुळे मंगळावर अजूनही मानवी वस्ती तयार होऊ शकली नाही.
पृथ्वीवरील एका वर्षापेक्षा मंगळावरील एक वर्ष मोठ्या कालावधीचे असते.