Mountain Climbing Day: आज राष्ट्रिय गिर्यारोहण दिवस, जाणून घ्या ही खास माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

बचेंद्री पाल

बचेंद्री पाल या भारतीय गिर्यारोहक आहेत. 1984 साली त्यांनी सर्वोच्च माऊंट एवरेस्ट सर केले. माऊंट एवरेस्ट सर करणाऱ्या त्या पहिला भारतीय महिला आहेत. 2019 साली त्यांना पद्मभुषण देऊन सन्मानित करण्यात आले.

पूर्णा मालावत

पूर्णा मालवत ही अवघ्या 13 व्या वर्षी माऊंट एवरेस्ट सर करणारी देशातील सर्वात तरूण मुलगी ठरली. पूर्णा वरती आता चित्रपट देखील येणार असल्याची चर्चा आहे.

शिवांगी पाठक

पूर्णा मालवत हिच्या सारखं शिवांगी पाठक हिने देखील वयाच्या 16 व्या वर्षी ऐवरेस्ट सर केले.

लव राज सिंह धर्मशक्तू

लव राज सिंह धर्मशक्तू यांनी सात वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे, आठव्यांदा सर करण्याचा ते प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मान केला आहे.

मनमोहन सिंग कोहली

मनमोहन सिंग कोहली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय गिर्यारोहक आहेत. कोहली भारतीय नौदल एक अधिकारी होते. 1965 साली त्यांनी नऊ जणांना एव्हरेस्टच्या शिखरावर नेले, त्यांचा हा विश्वविक्रम 17 वर्षे आबाधित होता.

नवांग गोम्बू शेर्पा

नवांग गोम्बू शेर्पा हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी दोन वेळा माऊंट एवरेस्ट सर केले आहे.

बॉबी मॅथ्यूज आणि जोश मॅडिगन

न्यू यॉर्कमधील एडिरॉन्डॅक पर्वताचे शिखर सर करणारे गिर्यारोहक बॉबी मॅथ्यूज आणि त्याचा मित्र जोश मॅडिगन यांच्या सन्मानार्थ 1 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय पर्वतारोहण दिन म्हणून साजरा केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.