'ज्या व्यक्तीने क्रिकेटर बनवले...'सचिन आचरेकर सरांच्या आठवणीत भावूक

Pranali Kodre

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील महान खेळाडू म्हणून ओळखला जातो, पण त्याला क्रिकेटपटू म्हणून घडवण्यात मोठा वाटा राहिला तो रमाकांत आचरेकर सरांचा.

Sachin Tendulkar-Ramakant Achrekar | Instagram

गुरू

आचरेकर सरांकडूनच सचिनने लहानपणी क्रिकेटचे धडे गिरवले. त्यांनीच त्याला मोठ्या स्थरावर क्रिकेट खेळण्यासाठी तयार केले.

Sachin Tendulkar-Ramakant Achrekar | Instagram

सचिनचे खास पोस्ट

सचिनने अनेकदा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण ३ डिसेंबर रोजी सचिनने आचरेकर सरांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

Sachin Tendulkar-Ramakant Achrekar | Instagram

फोटो

त्याने आरचरेकर सर फलंदाजीचे धडे देत असतानाचा जुना फोटो शेअर केला आहे.

Sachin Tendulkar-Ramakant Achrekar | Instagram

ज्यांनी क्रिकेटर बनवले...

तसेच सचिनने कॅप्शनमध्ये सचिनने लिहिले की 'तो व्यक्ती ज्याने मला क्रिकेटपटू बनवले. त्यांनी शिकवलेले धडे आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमची अधिकच आठवण होत आहे. आचरेकर सर तुम्ही माझ्यासाठी जे काही केले, त्यासाठी आभार.'

Sachin Tendulkar-Ramakant Achrekar | Instagram

आचरेकर सरांचे मार्गदर्शन

आचरेकर सरांनी सचिनच नाही, तर मुंबईतील अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले आहे.

Ramakant Achrekar | Instagram

शिष्य

आचरेकर सरांकडे शिकलेल्या क्रिकेटपटूंमध्ये सचिन व्यतिरिक्त विनोद कांबळी, प्रविण आमरे, अमोल मुजूमदार, अजित अगरकर अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

Sachin Tendulkar Vinod Kambli and Ramakant Achrekar | Instagram

WBBL विजेतेपद मिळवणारे संघ

Adelaide Strikers | X