Akshata Chhatre
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा वैद्यकीय उपयोग माहिती नसल्याने आपण बाजारात धाव घेतो.
यांपैकीच एक म्हणजे मिंट किंवा पुदीना. तुम्ही पेपरमिंट तर खाल्लं असेलच ना? पण या मिंटचे आणखीन काही गुण अजूनही आपल्याला माहिती नाहीये.
मिंटचं एक पान खाल्ल्याने तोंडाला येणारा वास नाहीसा होतो.
तुमच्या त्वचेवर सुद्धा पुदीना भरपूर गुणकारी सिद्ध झाला आहे, तोंडावर येणारे पिंपल्स दूर करण्यात पुदीना मदत करतो.
पुदिन्यात असलेल्या मेंथॉलमुळे श्वासाचे त्रास कमी व्हायला मदत मिळते.
सर्वात महत्वाचं म्हणजे पुदिना पचनशक्तीला मदत करतो, पचनक्रिया सुधारते.
आणि शेवटी पुदिन्यामुळे शरीराला रोगांविरुद्ध दोन हात करण्याची शक्ती मिळते.