प्रतीक्षा संपली! Tata Technologies चा IPO येतोय 'या' दिवशी; जाणून घ्या सर्व काही...

Akshay Nirmale

वर्षभरापासून उत्सुकता

गेल्या वर्षभरापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये टाटा समुहाच्या एका कंपनीच्या आयपीओची चर्चा सुरू होती. अखेर तो आयपीओ कधी येणार हे स्पष्ट झाले आहे.

Tata Technologies IPO | Dainik Gomantak

19 वर्षानंतर आयपीओ

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही टाटा समुहातील टाटा मोटर्स कंपनीची उपकंपनी आहे. टाटा समूह जवळपास 19 वर्षांनंतर IPO आणत आहे. यापूर्वी 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा IPO आला होता.

IPO | Dainik Gomantak

प्राईस बँड

Tata Technologies ने IPO ची किंमत 475 ते 500 रुपये निश्चित केली आहे. IPO साठी किरकोळ गुंतवणूकदाराला किमान एक लॉट म्हणजेच 30 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल.

IPO | Dainik Gomantak

कधी खुला होणार

IPO 22 नोव्हेंबरला उघडेल आणि 24 नोव्हेंबरला बंद होईल. कंपनी या IPO मधून सुमारे 3,042 कोटी रुपये उभे करायचे आहेत. ज्यासाठी कंपनी 6.08 कोटी इक्विटी शेअर्स विकणार आहे.

IPO | Dainik Gomantak

लिस्टिंग डेट

किरकोळ गुंतवणूकदार या IPO साठी 24 नोव्हेंबरपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स 5 डिसेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर सूचीबद्ध केले जातील.

IPO | Dainik Gomantak

35 टक्के हिस्सा राखीव

कंपनी IPO चा 50 टक्के हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) साठी, 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी तर उर्वरित 15 टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव आहे.

IPO | Dainik Gomantak

11081 कर्मचारी

वॉरेन हॅरिस कंपनीचे सीईओ आहेत. कंपनीत एकूण 11081 कर्मचारी आहेत. कंपनीची 18 जागतिक वितरण केंद्रे असून पुण्यात मुख्यालय आहे. तर गुडगाव, बेंगळुरू, ठाणे आणि चेन्नई येथेही कार्यालये आहेत.

IPO | Dainik Gomantak
virat kohli | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...