Akshay Nirmale
डिसेंबर महिना जवळ आला की गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलची चर्चा सुरू होते. तशी आताही ती सुरू झाली आहे. सनबर्न फेस्टिव्हलचे यंदाचे १७ वे वर्ष असेल.
सनबर्न हा आशियातील मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDM) फेस्टिव्हल आहे. हजारो लोक या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून येतात.
गोव्याच्या पर्यटन विभागाच्या सक्षमीकरण समितीने स्थळ बदलून महोत्सव आयोजित करण्यास परवानगी दिली. तसेच काही अटीही घातल्या आहेत.
यंदा 31 डिसेंबरला सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी दिलेली नाही. तर 28 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंतच हा महोत्सव होणार आहे.
उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात पुर्वी हा महोत्सव होत होता. या वेळी हा कार्यक्रम उत्तर गोव्यातील वागातोर येथे आयोजित केला जाणार आहे.
हा फेस्टिव्हल फक्त दुपारी 4 ते 10 या वेळेतच घेता येईल. रात्री 10 वाजेपर्यंत संगीत तयार करावे लागेल.
सनबर्न फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी 3 हजारापासून तिकीट दर असल्याचे सांगितले जाते.