Manish Jadhav
भारताचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने बुधवारी (18 डिसेंबर 2024) ही घोषणा केली. अश्विनच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य केले, कारण कोणालाच त्याची माहितीही नव्हती.
38 वर्षीय अश्विन आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकेल असा विश्वास होता. मात्र, आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसणार नसून केवळ आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धांमध्येच दिसणार आहे.
आज (18 डिसेंबर 2024) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून अश्विनच्या पाच शानदार रेकॉर्डबद्दल जाणून घेणार आहोत.
कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये अश्विन हा अनिल कुंबळेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेच्या नावावर 619 कसोटी विकेट्स होत्या.
अश्विनच्या नावावर कसोटीत 37 फाईव्ह विकेट्स आहेत. त्याच्यानंतर कुंबळे येतो. कुंबळेने कसोटीतील 35 डावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या. अश्विन शेन वॉर्नसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.
अश्विन हा कसोटीत सर्वाधिक प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड जिंकणारा खेळाडू आहे. त्याने कसोटीत 11 वेळा प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला आहे. या बाबतीत तो मुरलीधरनच्या बरोबरीने आहे.
कसोटीत 200 किंवा त्याहून अधिक बळी घेतलेल्या फिरकीपटूंमध्ये अश्विनचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम आहे. फिरकीपटूंमध्ये अश्विनचा गोलंदाजीचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम आहे. त्याचा स्ट्राइक रेट 50.7 आहे.
अश्विनने भारतात 65 कसोटीत 383 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये 29 डावात पाच विकेट्सचा समावेश आहे. 2011/12 मध्ये अश्विनच्या पदार्पणापासून, भारताने घरच्या मैदानावर 65 कसोटी सामने खेळले आहेत.