Akshay Nirmale
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांच्या जीवनावर आता चित्रपट येणार आहे. त्यांच्या बाायोपिकची तयारी हॉलीवूडमध्ये सुरू झाली आहे.
न्यूयॉर्कच्या A24 स्टुडिओने त्यांच्या आत्मचरित्राचे हक्क खरेदी केले आहेत.
'ब्लॅक स्वान' चे दिग्दर्शक डॅरेन अरोनोफस्की या बायोपिकचे दिग्दर्शन करतील.
मस्क यांनीही बायोपिक बनणार असल्याला दुजोरा दिला आहे. त्यांनी लिहिले आहे की, हे आनंददायी आहे. डॅरेन हा बायोपिक करत आहे, तो सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहे.
लेखक वॉल्टर आयझॅकसन यांनी लिहिलेले इलॉन मस्क यांचे चरित्र सप्टेंबरमध्ये प्रकाशित झाले होते. त्यावरच हा बायोपिक आहे. यापूर्वी आयझॅकसन यांनी स्टीव्ह जॉब्स यांचेही चरित्र लिहिले होते.
मस्क याच्या टेस्ला, स्पेस एक्स, पे पाल, न्यूरालिंक, ट्विटर या कंपन्या त्या-त्या क्षेत्रात अग्रगण्य आहेत.
मस्क यांचे आयुष्य चढउतारांचे राहिले आहे. एका फ्लाईट अटेंडंटने केलेला लैंगिक छळाचा आरोप, अभिनेत्री अॅम्बर हर्डसोबत रिलेशनशिप, पॉडकास्टमध्ये गांजा ओढणे या प्रकारांनी ते चर्चेत आले होते.