सेंच्युरियनवर सेंच्युरी करत KL Rahul चा मोठा विश्वविक्रम

Pranali Kodre

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सेंच्युरियनला कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर 2023 रोजी सुरु झाला आहे.

KL Rahul | X/BCCI

केएल राहुल

या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने शतकी खेळी केली.

KL Rahul

केएल राहुलचे शतक

केएल राहुलने 137 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकार मारले.

KL Rahul | X/BCCI

आठवे शतक

हे राहुलचे कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक ठरले. तसेच दक्षिण आफ्रिकेतील दुसरे शतक ठरले आहे.

KL Rahul | X/BCCI

सेंच्युरियनमध्ये सेंच्युरी

विशेष म्हणजे राहुलने यापूर्वी 2021 मध्ये देखील सेंच्युरियनमध्येच कसोटी सामना खेळताना 123 धावांची शतकी खेळी केली होती.

KL Rahul

कोणालाच न जमलेला विक्रम

केएल राहुलने सेंच्युरियनवर दुसरे कसोटी शतक ठोकल्यामुळे त्याने कोणालाच आत्तापर्यंत न जमलेला विक्रम केला आहे.

KL Rahul

पहिला परदेशी खेळाडू

केएल राहुल सेंच्युरियनवर दोन कसोटी शतके करणारा पहिलाच दक्षिण आफ्रिकेबाहेरचा म्हणजेच परदेशी खेळाडू ठरला आहे.

KL Rahul

विराट-सचिन

तसेच राहुलच्या पूर्वी सेंच्युरियनवर भारताकडून सचिन तेंडुलकरने 2010 साली, तर विराट कोहलीने 2018 साली प्रत्येकी एक शतक केले होते.

Virat Kohli

कमिन्सच्या पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स, अनिल कुंबळेच्या रेकॉर्डशीही बरोबरी

Pat Cummins