Manish Jadhav
भारतीय टू-व्हिलर कंपनी टीव्हीएसच्या स्कूटर एनटॉर्क 125 ने नवा टप्पा गाठला. या शानदार स्कूटरने 20 लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला.
ही स्कूटर पहिल्यांदा फेब्रुवारी 2018 मध्ये लॉन्च करण्यात आली होती, जी होंडा अॅक्टिव्हा सारख्या लोकप्रिय मॉडेल्सशी स्पर्धा करते.
एनटॉर्कला दहा लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी 4 वर्षांहून अधिक काळ लागला. मात्र दुसऱ्या 10 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधी लागला.
फ्लॅगशिप ज्युपिटरनंतर एनटॉर्क कंपनीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर बनली.
NTorq ही एकूण पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून किंमत 84,600 रुपयांपासून सुरु होऊन 104,600 रुपयांपर्यंत एक्स-शोरुममध्ये जाते.
या शानदार स्कूटरमध्ये शक्तिशाली इंजिन आहे, ज्याचे आउटपुट 10.2 एचपी आणि 10.8 एनएम आहे.