IPL 2025: किंग कोहलीला पछाडत राहुलची गगनभरारी! रचला इतिहास

Manish Jadhav

केएल राहुल

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत केएल राहुलने आपल्या शानदार फलंदाजीने क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले आहे.

KL Rahul | Dainik Gomantak

अफलातून अर्धशतक

मंगळवारी (22 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात राहुलने पुन्हा एकदा अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

KL Rahul | Dainik Gomantak

सर्वात जलद 5000 धावा

राहुलने आपल्या अर्धशतकाच्या जोरावर एक मोठी कामगिरीही केली. त्याने आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 5000 धावा पूर्ण केल्या. या बाबतीत त्याने विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे सोडले.

KL Rahul | Dainik Gomantak

रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड आता राहुलच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी, हा रेकॉर्ड डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता, ज्याने 135 डावांमध्ये हा पराक्रम केला होता. पण राहुलने फक्त 130 डावांमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या.

KL Rahul | Dainik Gomantak

सातत्य

राहुलने या हंगामात आतापर्यंत सातत्यपूर्ण धावा करुन संघाला एक मजबूत सुरुवात दिली आहे.

KL Rahul | Dainik Gomantak

कर्णधारपद नाकारले

हंगामापूर्वी अशी चर्चा होती की, त्याला दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद दिले जाऊ शकते, परंतु राहुलने स्वतः ते नाकारले. त्याने अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा निर्णय घेतला.

KL Rahul | Dainik Gomantak

शानदार खेळी

लखनऊ जायंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलने 42 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी खेळली. त्याने या खेळीदरम्यान 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

KL Rahul | Dainik Gomantak

8 विकेट्सने सामना जिंकला

फलंदाजीमध्ये राहुलने तर गोलंदाजीमध्ये मुकेश कुमारने शानदार प्रदर्शन केले. त्यांच्या या प्रदर्शनाच्या जोरावर दिल्लीने लखनऊविरुद्धचा सामना 8 विकेट्सने जिंकला.

KL Rahul | Dainik Gomantak
आणखी बघा