Beauty Tips: महागडे फेशिअल विसरा, घरच्या घरी मिळवा नॅचरल ग्लो; स्वयंपाकघरातील 'या' 7 गोष्टी बदलतील तुमचं रुपडं!

Manish Jadhav

हळद

हळदीमधील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचा रंग नैसर्गिकरित्या उजळण्यास आणि पिंपल्सची समस्या कमी करण्यास मदत करतात. हे चेहऱ्यावरील डाग घालवून त्वचा नितळ बनवते.

turmeric | Dainik Gomantak

दही

दही त्वचेला मॉइश्चराईज करते आणि उन्हामुळे आलेला चेहऱ्यावरील काळेपणा (टॅनिंग) झटपट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. याच्या वापराने त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार होते.

curd | Dainik Gomantak

मध

मध हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर असून ते त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते आणि चेहऱ्याला एक वेगळीच चमक देते. कोरड्या त्वचेची समस्या दूर करुन चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी हे उत्तम आहे.

honey | Dainik Gomantak

कॉफी

कॉफी चेहऱ्यावरील मृत त्वचा आणि साचलेली घाण काढून टाकण्यासाठी एक उत्तम नॅचरल स्क्रबर म्हणून काम करते. यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला इन्स्टंट ग्लो मिळतो.

Coffee | Dainik Gomantak

कोरफड

कोरफड जेल त्वचेला थंडावा देते आणि सनबर्न, सूज तसेच चेहऱ्यावरील काळे डाग कमी करून त्वचेचे रक्षण करते. याच्या नियमित वापराने त्वचा दीर्घकाळ तरुण, घट्ट आणि डागमुक्त राहते.

Aloe Vera | Dainik Gomantak

बेसन

बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि चेहऱ्याची त्वचा आतून स्वच्छ करुन पोर्समधील घाण साफ करते. तेलकट त्वचेची समस्या असलेल्यांसाठी हे रुप खुलवण्याचा एक उत्तम पर्याय आहे.

Face Pack | Dainik Gomantak

टोमॅटो

टोमॅटोमधील लायकोपीन आणि व्हिटॅमिन-सी चेहऱ्यावरील मोठे झालेले पोर्स कमी करण्यास आणि वृद्धत्वाची लक्षणे रोखण्यास मदत करतात. हे चेहऱ्याला नैसर्गिक लाली आणि चमक देते.

Tomato | Dainik Gomantak

Lip Care Tips: पार्लरच्या महागड्या प्रोडक्ट्सला म्हणा आता बाय-बाय! गुलाबी ओठांसाठी आजच वापरुन पाहा 'या' 7 नॅचरल टिप्स

आणखी बघा