Manish Jadhav
उत्तर कोरियामध्ये महिलांवर अनेक जाचक बंधने आहेत. महिलांसाठी देशात अनेक कडक नियम आहेत. यातच आता, देशातील जन्मदरातील घट थांबवणे हे महिलांचे कर्तव्य असल्याचे किम जोंग उनने म्हटले.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उनचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये किम एका कार्यक्रमाला संबोधित करताना रडताना आणि अश्रू पुसताना दिसत आहेत.
उत्तर कोरिया सध्या घटत्या जन्मदराचा सामना करत आहे. या कार्यक्रमादरम्यान किम जोंग यांनी उत्तर कोरियातील घटत्या प्रजनन दरावर चिंता व्यक्त केली.
किम जोंग-उनने महिलांना जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.
प्रजनन दरात होणारी घट रोखण्यासाठी आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी मातांसोबत सर्व कुटुंबांची आहे, असे किम म्हणाले.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अंदाजानुसार, उत्तर कोरियामध्ये सध्याचा प्रजनन दर सध्या 1.8 आहे. उत्तर कोरियातील प्रजनन दर गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने घसरला आहे. तथापि, उत्तर कोरियामधील प्रजनन दर अजूनही शेजारील देश दक्षिण कोरिया (प्रजनन दर: 0.78) आणि जपान (प्रजनन दर: 1.26) पेक्षा जास्त आहे.
उत्तर कोरियाने 1970-80 च्या दशकात लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी बर्थ कंट्रोल प्रोग्राम लागू केला होता.