Pramod Yadav
गोव्यात होणाऱ्या अपघातांच्या संख्येमुळे राज्याची 'किलर स्टेट' अशी ओळख झाली आहे.
राज्यात यावर्षाच्या गेल्या 105 दिवसांत 92 भीषण अपघात झाले त्यात 97 जणांचा मृत्यू झाला आहे.
01 जानेवारी ते 14 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यात एकूण 849 अपघातांची नोंद झाली आहे.
सरासरी पाहिली असता राज्यात दिवसाला किमान आठ अपघात होत असल्याचे समोर आले आहे.
केवळ एप्रिलच्या 14 दिवसांची आकडेवारी पाहिली असता गेल्या काही दिवसांत 17 जण अपघातात ठार झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे राज्यात होणाऱ्या अपघतांमध्ये दुचाकी अपघातांची संख्या अधिक आहे.
गोव्यातील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान गोवा सरकारसमोर आहे.