Akshata Chhatre
मुलांची नीट झोप ही त्यांच्या आरोग्यासाठी, मूडसाठी आणि एकंदर विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते.
दररोज ठराविक वेळी झोपायला घालण्याची सवय लावा. झोपेची वेळ नियमित ठेवल्यास बाळाचे शरीर त्या वेळेस झोपेसाठी सज्ज होते.
बाळ दुपारी 1 ते 1.5 तास झोपले तरी पुरेसे आहे. दिवसा जास्त झोपल्यास रात्री जागरण निश्चित.
झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही बंद करा. स्क्रीनच्या प्रकाशामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो.
दिवे मंद करा, शांत संगीत वाजवा, थोडं गार वातावरण तयार करा. शांतता म्हणजे झोपेसाठी आदर्श स्थिती.
बाळाला सुती, मऊ व सैल कपडे घाला. घट्ट व अस्वस्थ कपड्यांमुळे बाळाला त्रास होतो आणि झोप मोडते.