Kidney Damage: किडनी डॅमेज होण्याआधी शरीर देतं 'हे' 6 संकेत; दुर्लक्ष केलात तर पडू शकतं महागात!

Sameer Amunekar

किडनी डॅमेज

अनेक लोकांना किडनीच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याची कारणंही वेगवेगळी असतात. किडनी डॅमेज होण्याची लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे, कारण याकडे दुर्लक्ष केलात तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.

Kidney Damage | urination

लघवीशी संबंधित समस्या

वारंवार लघवीला जाणे किंवा लघवी कमी होणे. लघवीत फेसाळपणा किंवा रक्त आढळणे. लघवीचा रंग गडद किंवा बदललेला असणे.

Kidney Damage | Dainik Gomantak

थकवा

शरीरात विषारी पदार्थ साचल्यामुळे सतत थकवा जाणवतो. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास अशक्तपणा जाणवू शकतो.

Kidney Damage | Dainik Gomantak

पाय, हात आणि चेहरा सुजणे

किडनी योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा शरीरात पाणी साचतं आणि पाय, हात, चेहरा सुजतो.

Kidney Damage | Dainik Gomantak

रक्तदाब

किडनी कार्यक्षम नसल्यास रक्तदाब नियंत्रित राहत नाही आणि रक्तदाब वाढतो.

Kidney Damage | Dainik Gomantak

भूक कमी होणे आणि मळमळ

अन्न खाण्याची इच्छा कमी होते. सतत मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात, हेही किडनी डॅमेजचं लक्षण आहे.

Kidney Damage | Dainik Gomantak

त्वचेसंबंधी समस्या

जेव्हा किडनीमध्ये काही समस्या असते, त्यावेळी त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज सुटते. त्वचेवर पुरळ किंवा लालसर चट्टे येतात.

Kidney Damage | Dainik Gomantak
Romantic Places In Goa | Dainik Gomantak
जोडप्यांसाठी गोव्यातील रोमॅंटीक ठिकाणं