Sameer Amunekar
गोवा हे प्रेमी युगुलांसाठी एक सुंदर आणि रोमँटिक ठिकाण आहे. समुद्रकिनारे, निसर्गरम्य स्थळे आणि शांत वातावरणामुळे हे कपल्ससाठी एक उत्तम डेस्टिनेशन ठरते.
पाळोळे बीच (Palolem Beach) हा दक्षिण गोव्यातील सर्वात सुंदर आणि शांत समुद्रकिनार्यांपैकी एक आहे. आपल्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध बीच आहे. हा बीच जोडप्यांसाठी, कुटुंबांसाठी आणि साहसी पर्यटकांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.
शापोरा फोर्ट (Chapora Fort) हा गोव्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो आपल्या सुंदर समुद्रदृश्य आणि प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट "दिल चाहता है" मुळे प्रसिद्ध झाला आहे. हा किल्ला गोव्याच्या उत्तर भागात स्थित असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.
ग्रँड आइलँड (Grand Island) हे गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि रोमांचक ठिकाणांपैकी एक आहे. हे बेट मुख्यतः स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि डॉल्फिन सफारीसाठी ओळखले जाते. गोव्यातील निसर्गरम्य समुद्री सौंदर्य आणि अंडरवॉटर जीवन पाहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
मांडवी नदी (Mandovi River) ही गोव्यातील सर्वात प्रसिद्ध नद्यांपैकी एक आहे. संध्याकाळी नदीवरून निघणाऱ्या या क्रूझवर तुम्ही सूर्यासोबतच्या अद्भुत रंगछटांचा आनंद घेऊ शकता.
कांदोळी बीच (Candolim Beach) गोव्यातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. कांदोळी बीचवर वॉटर स्पोर्ट्सच्या विविध प्रकारांचा आनंद घेता येतो, ज्यात जेट स्कीइंग, बनाना राईड, कयाकिंग, आणि पॅरासेलिंग समाविष्ट आहे.