Akshata Chhatre
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने तिच्या गरोदरपणाची आनंदवार्ता सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
कियारा आणि तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करत गरोदरपणाच्या बातमीची घोषणा केली.
कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक गोड फोटो पोस्ट केला आहे. यात लहान मुलाचे दोन पायमोजे आहेत आणि कियारा आणि सिद्धार्थने हे पायमोजे हातात धरले आहेत.
कियाराच्या गरोदरपणाच्या घोषणेनंतर, दोघांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
कियारा आडवाणीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. "कबीर सिंग", "शेरशाह", आणि "भूल भुलैया 2" यांसारख्या मोठ्या हिट्समध्ये ती दिसली.
त्यांच्या चाहत्यांना आता या आनंदी जोडीचे पुढील अपडेट्स पाहण्याची उत्सुकता लागली आहे.