नवीन Z-Series इंजिनसह Swift लाँच; मायलेज आणि स्पोर्टी डिझाइनने वेधले लक्ष

Manish Jadhav

नवीन Z-सिरीज इंजिन

मारुतीने स्विफ्टमध्ये मोठा बदल करत जुने 4-सिलेंडर K-सिरीज इंजिन काढून टाकले आणि नवे 1.2-लीटर, 3-सिलेंडर Z-सिरीज पेट्रोल इंजिन दिले. हे इंजिन 80 बीएचपी पॉवर जनरेट करते.

2025 Maruti Suzuki Swift | Dainik Gomantak

मायलेजचा नवा रेकॉर्ड

हे नवीन इंजिन जबरदस्त मायलेज देते. मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 24.8 किमी/लीटर, तर ऑटोमॅटिक (AMT) मध्ये 25.75 किमी/लीटर इतके मायलेज मिळते, ज्यामुळे ही कार अधिक इंधन-कुशल ठरते.

2025 Maruti Suzuki Swift | Dainik Gomantak

CNG पर्याय

तसेच, मायलेजचा विचार करणाऱ्यांसाठी सीएनजी (CNG) व्हेरिएंट उपलब्ध आहे, जे सुमारे 32.85 किमी/किलोचा मायलेज देते. हा मायलेज या सेगमेंटमध्ये सर्वाधिक आहे.

2025 Maruti Suzuki Swift | Dainik Gomantak

डिझाइनमध्ये बदल

2025 स्विफ्टने तिचा कॉम्पॅक्ट लूक कायम ठेवला असला तरी, ती पूर्वीपेक्षा थोडी लांब (3860mm) झाली आहे. डिझाइन अधिक स्पोर्टी आणि आकर्षक बनवण्यात आले आहे.

2025 Maruti Suzuki Swift | Dainik Gomantak

टॉप सेफ्टी फीचर्स

याशिवाय, सुरक्षेला प्राधान्य देत मारुतीने आता 6 एअरबॅग्स (Airbags) दिल्या आहेत. तसेच ABS, EBD, ESP आणि हिल होल्ड असिस्ट सारखे महत्त्वाचे फीचर्स देखील यात आहेत.

2025 Maruti Suzuki Swift | Dainik Gomantak

हाय-टेक इंटिरियर

तर केबिनला देखील नवा लूक देण्यात आला आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, जी वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते.

2025 Maruti Suzuki Swift | Dainik Gomantak

अद्ययावत सुविधा

या शानदार कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर आणि पुश-बटन स्टार्ट/स्टॉप यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक आरामदायक होतो.

2025 Maruti Suzuki Swift | Dainik Gomantak

5 ट्रिम आणि 10 कलर पर्याय

ही नवीन स्विफ्ट LXi, VXi, VXi(O), ZXi आणि ZXi+ अशा 5 ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. ग्राहक आपल्या आवडीनुसार 10 आकर्षक रंगांमधून निवड करू शकतात.

2025 Maruti Suzuki Swift | Dainik Gomantak

Lemon Water: वेट लॉस जर्नीत लिंबू पाणी का गरजेचं? जाणून घ्या 'हे' चमत्कारिक फायदे

आणखी बघा