Manish Jadhav
मुघलांनी भारतावर जवळपास 330 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. पण तुम्हाला माहितीये आहे का की, केरळ हे एकमेव राज्य होते, जिथे मुघल साम्राज्याला थेटपणे सत्ता प्रस्थापित करता आली नाही. याचे अनेक कारणे होती. चला तर मग या कारणांविषयी जाणून घेऊया..
केरळमधील घनदाट जंगल, डोंगराळ प्रदेश (पश्चिम घाट), आणि किनारपट्टीवरील स्थान मुघलांसाठी अडथळा ठरले. त्यांच्या मोठ्या घोडदळ आणि पायदळ सेनेला येथे सहज हालचाल करणे कठीण होते.
केरळमध्ये वेगवेगळ्या राजांची सत्ता होती. झमोरीन, त्रावणकोर आणि कोचीनचे राजे एकप्रकारे संघटित होते. त्यांनी मुघलांच्या आक्रमणाचा यशस्वीरित्या प्रतिकार केला.
केरळमधील काही राजांनी पोर्तुगीज, डच आणि नंतर ब्रिटिश यांच्याशी संबंध प्रस्थापित केले, त्यामुळे मुघलांसाठी हा प्रदेश जिंकणे कठीण बनले.
मुघलांची सत्ता प्रामुख्याने उत्तर आणि मध्य भारतात केंद्रित होती. दक्षिण भारतातील विस्तारासाठी त्यांना विजयनगर आणि नंतर मराठ्यांसोबत लढावे लागले, त्यामुळे केरळकडे त्यांना विशेष लक्ष देता आले नाही.
वरील कारणांमुळे केरळ मुघल साम्राज्याच्या थेट नियंत्रणाखाली कधीच आले नाही. मात्र त्यांनी दक्षिण भारतातील इतर भागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.