Manish Jadhav
भारतीय एसयूव्ही उत्पादक महिंद्राने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा थार रॉक्सचे अपडेटेड 205 मॉडेल लॉन्च केले आहे.
एवढेच नाही तर कंपनीने महिंद्रा एसयूव्हीमध्ये 3 नवीन फिचर्स देखील अपडेट केले आहेत, ज्यामुळे महिंद्रा एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी आणि सोयीस्कर बनली आहे.
महिंद्राने त्यात कीलेस एन्ट्री, स्लाइडिंग आर्मरेस्ट आणि एरो वायपर्स दिले आहेत. याशिवाय, एसयूव्हीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आतापर्यंत, ग्राहकांना थार रॉक्स अनलॉक आणि लॉक करण्यासाठी कीफॉबचा वापर करावा लागत होता. तथापि, आता कीलेस एन्ट्रीबरोबर दरवाजाच्या हँडलवर एक बटण दिले, जे प्रेस करताच कार अनलॉक आणि लॉक होते. त्यामुळे ग्राहकांना आता कीफॉबची गरज भासणार नाही.
आता त्यात स्लाइडिंग आर्मरेस्ट देखील उपलब्ध आहे. आतापर्यंत आर्मरेस्ट फक्त ड्रायव्हरसाठी उपलब्ध होता, परंतु आता सह-प्रवासी आणि मागच्या प्रवाशालाही आर्मरेस्टची सुविधा मिळणार आहे. एसयूव्हीमध्ये एरोटविन शैलीतील वाइपर्स देण्यात आले आहेत.
महिंद्रा थार रॉक्सची किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 23.09 लाख रुपयांपर्यंत जाते. दोन्ही किमती एक्स-शोरुम आहेत.
महिंद्रा थार रॉक्समध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन आणि 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देत आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहेत. याशिवाय, थार रॉक्समध्ये डिझेल इंजिनसह 4×4 पॉवरट्रेन देखील येते.
महिंद्रा थार रॉक्स ही 5 दरवाज्यांची कार आहे, जी 6 वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, त्यात MX1, MX3, AX3L, MX5, AX5L आणि AX7L चा ऑप्शन आहे.