Sameer Panditrao
केरळ म्हंटल की डोळ्यासमोर येतो विस्तीर्ण समुद्रकिनारा, किनाऱ्यावरील नारळाच्या मोठ्या बागा.
नारळाची भूमी अशी ओळख असलेल्या या राज्यापुढे ती गमविण्याचे मोठे आव्हान आहे
केरळात नारळाच्या बागांची संख्या कमी होत असून उत्पादनातही घट होत आहे.
एकेकाळी सहजपणे व स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या नारळ व खोबरेल तेलाचे दर अनुक्रमे ८५ रुपये किलो व ६०० रुपये लिटरवर पोचले आहेत.
देवभूमी म्हटल्या जाणाऱ्या केरळमधील स्वयंपाकघरात आता नारळ व खोबरेल तेलाला पर्याय शोधला जात आहे.
जगात नारळाची मागणी वाढत असताना दुसरीकडे केरळमध्ये मात्र, नारळाचे क्षेत्र कमी होत आहे.
बांधकाम क्षेत्राच्या वाढत्या किमती, हवामान बदल आदींमुळे संपूर्ण केरळमध्ये नारळाच्या एकूणच उत्पादनात सातत्याने घट होत आहे.