Manish Jadhav
मान्सूनमध्ये गोवा पूर्णपणे हिरवीगार शाल पांघरल्यासारखा दिसतो. धुके आणि पावसाच्या सरींमुळे येथील डोंगर आणि डोंगरकड्यांचे सौंदर्य अधिक खुलते.
पावसाळ्यात गोव्यातील धबधबे पूर्ण क्षमतेने वाहू लागतात. खासकरुन, दूधसागर धबधबा या हंगामात आपल्या रौद्र रुपात दिसतो, जे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते.
पावसाळ्यात गोव्यातील जंगले आणि डोंगररांगा ट्रेकिंगसाठी उत्तम असतात. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य यांसारख्या ठिकाणी तुम्ही निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेऊ शकता.
ऑफ-सीझन असल्यामुळे प्रमुख पर्यटनस्थळे शांत आणि कमी गर्दीची असतात. त्यामुळे तुम्हाला गोव्याचा खरा आणि शांत अनुभव घेता येतो.
पावसाळ्यात हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि विमान तिकिटांचे दर कमी असतात. त्यामुळे, कमी बजेटमध्ये तुम्हाला गोव्याच्या सहलीचा मनसोक्त आनंद घेता येतो.
मान्सूनमध्ये गोव्यातील पारंपरिक खाद्यपदार्थांचा, विशेषतः ताजी पकडलेली मच्छी आणि प्रसिद्ध गोवन फेणी यांचा आस्वाद घेण्याचा वेगळाच अनुभव मिळतो.
कमी गर्दीमुळे गोव्यातील जुनी चर्च, किल्ले आणि पोर्तुगीज वास्तुकला शांतपणे आणि निवांतपणे पाहता येते.
मान्सूनमध्ये समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे समुद्रात पोहण्याचा प्रयत्न करु नये. तसेच, जोरदार पावसात बाहेर पडताना सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.