Beautiful Village In Konkan: या सुट्टीत 'मिनी गोवा' शोधताय? मग कोकणातील 'केळशी' गावाला नक्की भेट द्या!

Manish Jadhav

शांत आणि निसर्गरम्य गाव

दापोली तालुक्यातील निसर्गरम्य केळशी गाव शांत आणि पर्यटकांच्या गजबजाटापासून दूर आहे.

Dainik Gomantak

याकूब बाबा दर्गा

केळशीमध्ये सुमारे 350-400 वर्ष जुना हजरत याकूब बाबा यांचा दर्गा आहे. शिवाजी महाराजांनी या दर्ग्याच्या बांधकामासाठी मदत केली होती, असे मानले जाते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे हे एक उत्तम प्रतीक आहे.

Dainik Gomantak

प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिर

हे मंदिर पेशवेकालीन असून अत्यंत शांत आणि पवित्र आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती आणि परिसरातील कोरीव काम पाहण्यासारखे आहे. दरवर्षी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

Dainik Gomantak

दुर्मिळ 'वाळूची टेकडी'

केळशीतील किनाऱ्याजवळ निसर्गाचा एक चमत्कार पाहायला मिळतो, तो म्हणजे वाळूची प्रचंड मोठी टेकडी. कित्येक वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीमुळे ही टेकडी तयार झाली असावी, असे भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात.

Dainik Gomantak

कोकणी आदरातिथ्य आणि खाद्यसंस्कृती

केळशीमध्ये तुम्हाला अस्सल कोकणी पाहुणचार अनुभवायला मिळतो. ताजी मासळी, सोलकढी, उकडीचे मोदक आणि कोकणी मेव्याचा आस्वाद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Dainik Gomantak

पक्षीप्रेमींसाठी नंदनवन

केळशी हे गाव निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी एक पर्वणी ठरते.

Dainik Gomantak

प्रदूषणमुक्त आणि कौलारु घरे

केळशी गावात फिरताना तिथली पारंपारिक कौलारु घरे आणि वाड्या पाहायला मिळतात. गावाची शांतता आणि प्रदूषणमुक्त वातावरण मनाला खूप सुखद गारवा देते.

Dainik Gomantak

जवळची पर्यटन स्थळे

केळशीला भेट दिल्यानंतर तुम्ही जवळच असलेले आंजर्ले (कड्यावरचा गणपती), हर्णे बंदर आणि मुरुडचा किनारा यांसारख्या ठिकाणांनाही सहज भेट देऊ शकता.

Dainik Gomantak

Ramshej Fort: औरंगजेबाची मस्ती उतरवली, कर्दनकाळ ठरला 'रामशेज', 600 मावळ्यांनी 60 हजार मोगलांना कसं रोखलं? वाचा थरारक इतिहास

आणखी बघा