Sameer Panditrao
काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणाऱ्या संफरचंद व्यवसायाला यंदा मोठा फटका बसला असून, किमती जवळपास ७० टक्क्यांनी कोसळल्या आहेत.
सोपोरपासून शोपियाँपर्यंत आणि पुलवामापासून कुलगामपर्यंत सफरचंदाच्या बागायतदारांमध्ये या परिस्थितीमुळे नैराश्य पसरले आहे.
वाहतूक शुल्क अजूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त आहे.
बॉक्सचे दर वाढले आहेत.
मजुरी अधिक द्यावी लागत आहे.
गेल्या वर्षी सफरचंदाच्या एका बॉक्सला 1200 ते 1400 रुपये मिळाले होते यावर्षी मात्र, त्याच दर्जाच्या सफरचंदासाठी एका बॉक्सला फक्त 300 ते 400 रुपयेच मिळत आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सफरचंद लागवडीमुळे सुमारे ३.५ दशलक्ष लोकांना थेट किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळतो.