Manish Jadhav
काशिद समुद्रकिनारा हा त्याच्या पांढऱ्याशुभ्र आणि मऊ वाळूसाठी ओळखला जातो. यामुळेच याला 'कोकणातील मिनी मॉरिशस' असे म्हटले जाते. येथील स्वच्छ किनारा पर्यटकांना भुरळ घालतो.
मुंबईपासून साधारण 125 किमी आणि पुण्यापासून 170 किमी अंतरावर असल्याने, हा किनारा 'विकेंड गेटवे'साठी सर्वोत्तम पर्याय आहे. अलिबागपासून हा किनारा फक्त 30 किमी अंतरावर आहे.
किनाऱ्यालगत असलेल्या सुरुच्या (Casuarina) झाडांची दाट रांग या ठिकाणचे सौंदर्य अधिक वाढवते. या झाडांच्या सावलीत बसून समुद्राचा आनंद घेणे हा एक वेगळाच अनुभव असतो.
साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी काशिदमध्ये पॅरासेलिंग, बनाना राईड, जेट स्की आणि बंपर राईड यांसारख्या वॉटर स्पोर्ट्सची उत्तम सोय उपलब्ध आहे.
काशिदमध्ये रात्रीच्या वेळी 'बीच साईड कॅम्पिंग' खूप प्रसिद्ध आहे. रात्री समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत तंबूत राहण्याचा आणि कॅम्पफायरचा अनुभव पर्यटक आवर्जून घेतात.
काशिद किनाऱ्याच्या अगदी जवळ 'फणसाड पक्षी अभयारण्य' आहे. निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी हे एक उत्तम ठिकाण असून येथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.
काशिदपासून साधारण 20-22 किमी अंतरावर मुरुड-जंजिरा हा अभेद्य जलदुर्ग आहे. काशिदला येणारे पर्यटक आवर्जून या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देतात.
येथे येणारे पर्यटक अस्सल कोकणी जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. माशांचे विविध प्रकार आणि 'सोलकढी' हे येथील मुख्य आकर्षण आहे.