गोमन्तक डिजिटल टीम
तुमच्या गोवा ट्रीपमध्ये तुम्हाला बीचेस, कॅसिनो सोडून काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल तर ही माहिती आहे फक्त तुमच्यासाठीच.
गोव्यात बाईक राईड करायला तुम्हाला आवडत असेल तर आम्ही तुम्हाला देत आहोत एका वेगळ्या रूटची माहिती.
पोंबुर्पा ते पणजी जाण्यासाठी महामार्ग सोडून नदीजवळून गावगावातून एक छोटा रस्ता जातो.
निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असणारा हा रस्ता सध्या बाईक राईडसाठी प्रसिद्ध होत आहे.
गावगावातून जाणाऱ्या या रस्तावर वर्दळ कमी असते आणि त्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता .
भातशेती, नारळाच्या झाडांमुळे या रस्त्यावर तुम्ही नजर टाकाल तिकडे हिरव्या रंगाची उधळण झालेली दिसते.
या मार्गावर तुम्हाला नदीच्या काठी, विहिरींवरती परंपरिक मासेमारी पाहण्याचा आनंद घेता येईल.
अवघ्या तीस मिनिटे ते एक तासाचा हा प्रवास थंडगार वाऱ्यासोबत आणि गोव्याच्या विलोभनीय निसर्गासोबत तुम्हाला निखळ आनंद देईल.