कार्तिक आर्यनच्या परफॉर्मन्सने रंगणार WPL 2024 चा उद्घाटन सोहळा

Pranali Kodre

WPL 2024

वूमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाला 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात होणार आहे.

WPL 2023 Trophy | Dainik Gomantak

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामना बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

Mumbai Indians vs Delhi Capitals | Dainik Gomantak

उद्घाटन सोहळा

या सामन्यापूर्वी बीसीसीआयने उद्घाटन सोहळा आयोजित केला असून याबद्दल माहिती दिली आहे.

WPL 2023 Captains | X

कार्तिक आर्यनचा परफॉर्मन्स

उद्घाटन सोहळ्याबद्दल केलेल्या पोस्टमध्ये माहिती देण्यात आली आहे की यावेळी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन परफॉर्मन्स करणार आहे.

Kartik Aaryan | Instagram

आणखीही सेलिब्रेटी होणार सहभागी?

कार्तिक आर्यनव्यतिरिक्त अजून कोणते सेलिब्रेटी या उद्घाटन सोहळ्यात सामील होणार की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

Kartik Aaryan | Instagram

तारिख आणि वेळ

वूमन्स प्रीमियर लीग 2024 उद्घाटन सोहळा 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता चालू होईल.

WPL 2023 Opening Ceremony | X

WPL 2023 उद्घाटन सोहळा

वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यात कियारा अडवाणी, क्रिती सेनन आणि एपी ढिल्लों यांचे परफॉर्मन्स झाले होते.

WPL 2023 Opening Ceremony | Dainik Gomantak

अंतिम सामना

वूमन्स प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम 17 मार्च रोजी संपणार आहे. या दिवशी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

WPL | X

Team India ने कसोटीत सर्वाधिक धावांच्या फरकाने जिंकलेले 5 सामने

Team India | ANI