Karanala Fort: निसर्ग आणि तलवारींची गाज! मुंबई-कोकणावर नजर ठेवणारा शिवरायांचा 'कर्नाळा' किल्ला; 350 वर्षांची सांगतो गाथा

Manish Jadhav

कर्नाळा किल्ला

मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर नजर ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ला हा रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. शिवरायांनी स्वराज्याच्या विस्तारासाठी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून तो ताब्यात घेण्याचे ठरवले.

Karanala Fort | Dainik Gomantak

1670 चा ऐतिहासिक विजय

पुरंदरच्या तहानंतर मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्यासाठी महाराजांनी मोहीम आखली. 1670 मध्ये मराठा सैन्याने मुघलांना धूळ चारुन कर्नाळा किल्ला स्वराज्यात पुन्हा सामील केला.

Karanala Fort | Dainik Gomantak

शिवरायांची युद्धनीती

कर्नाळ्याचा वेढा आणि विजय हा शिवरायांच्या गनिमी काव्याचा उत्तम नमुना मानला जातो. भौगोलिक स्थितीचा फायदा घेत मावळ्यांनी अत्यंत शिताफीने हा किल्ला सर केला होता.

Karanala Fort | Dainik Gomantak

अभेद्य तटबंदी

महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करुन तटबंदी मजबूत केली. किल्ल्याच्या माथ्यावर असलेला 'अंगठा' हा नैसर्गिक बुरुजासारखा असून तिथून शत्रूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जायचे.

Karanala Fort | Dainik Gomantak

लष्करी छावणी आणि रसद केंद्र

शिवकाळात कर्नाळा हा केवळ किल्ला नसून एक महत्त्वाचे लष्करी केंद्र होते. येथून जंजिऱ्याच्या सिद्दीवर आणि पोर्तुगीजांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे सोपे जात असे.

Karanala Fort | Dainik Gomantak

शिवकालीन टाक्या

किल्ल्यावर आजही दगडात खोदलेली पाण्याची टाकी पाहायला मिळतात. गडावर राहणाऱ्या सैन्याला बाराही महिने पाणी मिळावे, यासाठी शिवरायांच्या काळात पाण्याचे चोख नियोजन केले होते.

Karanala Fort | Dainik Gomantak

निसर्ग आणि शौर्याचा संगम

आज जिथे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे, तिथूनच शिवरायांचे मावळे गडावर चढाई करायचे. दाट जंगल आणि निसर्ग आजही त्यावेळच्या थरारक संघर्षाची आठवण करुन देतो.

Karanala Fort | Dainik Gomantak

शिवप्रेमींसाठी तीर्थक्षेत्र

कर्नाळा किल्ला हा केवळ पर्यटनाचे ठिकाण नसून शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे जिवंत स्मारक आहे. गडावर गेल्यावर प्रत्येक शिवभक्ताला स्वराज्याच्या इतिहासाची प्रचिती येते.

Karanala Fort | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा