Fitness Secrets: वय 52, पण फिटनेस एकदम जबरदस्त! करिश्मा कपूरच्या फिटनेसचं रहस्य काय? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने केला खुलासा

Sameer Amunekar

फिटनेसचं रहस्य चांगल्या सवयींमध्ये!

वयाच्या ५२ व्या वर्षीही करिश्मा कपूर फिट दिसते. यामागे केवळ एखादा खास पदार्थ नाही, तर अनेक वर्षांपासून जपलेल्या चांगल्या सवयी महत्त्वाच्या आहेत.

Karisma Kapoor Fitness Secrets | Dainik Gomantak

तिशीनंतर आरोग्याकडे द्या लक्ष

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात. वजन वाढणं किंवा कंबरेभोवती चरबी जमा होणं असे बदल जाणवू शकतात.

Karisma Kapoor Fitness Secrets | Dainik Gomantak

आठवड्यातून तीन तास व्यायाम

केवळ वजन कमी करण्याऐवजी शरीर मजबूत आणि सक्रिय ठेवण्यावर भर द्या. नियमित व्यायामासाठी आठवड्यातून किमान तीन तास वेळ द्या.

Karisma Kapoor Fitness Secrets | Dainik Gomantak

वेगाने चालणं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग

फिट राहण्यासाठी वेगाने चालणं, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि क्षमतेनुसार इतर शारीरिक हालचाली दिनचर्येत समाविष्ट करा.

Karisma Kapoor Fitness Secrets | Dainik Gomantak

भात आणि पोळी खाणं बंद करू नका

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भात, पोळी किंवा कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. संतुलित आहार घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

Karisma Kapoor Fitness Secrets | Dainik Gomantak

रात्रीचं जेवण टाळणं टाळा

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याऐवजी योग्य प्रमाणात आणि पोषक घटकांनी युक्त आहार घ्या. आहारावर अतिप्रमाणात निर्बंध घालू नका.

Karisma Kapoor Fitness Secrets | Dainik Gomantak

शरीराला आवश्यक पोषक घटक द्या

व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२, लोह आणि कॅल्शियम शरीरासाठी महत्त्वाचे आहेत. संतुलित आहारातून आवश्यक पोषण मिळवा आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Karisma Kapoor Fitness Secrets | Dainik Gomantak

चेहऱ्यावरचा नैसर्गिक ग्लो टिकवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!

येथे क्लिक करा