Pranali Kodre
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सनला एक गोड बातमी नुकतीच मिळाली आहे.
विलियम्सनची पार्टनर साराह रहिम हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे, याबद्दल विलियम्सननेच 28 फेब्रुवारी 2024 रोजी माहिती दिली आहे.
विलियम्सन आणि साराह यांचे हे तिसरे अपत्य आहे.
यापूर्वी 2020 मध्ये या जोडप्याला पहिली मुलगी झाली होती, जिचे नाव त्यांनी मॅगी असल्याचे अनेकदा विलियम्सनच्या पोस्टमधून दिसले आहे.
त्यानंतर विलियम्सन आणि साराह यांना 2022 मध्ये मुलगा झाला आहे. त्यानंतर आता 2024 मध्ये या जोडप्याला तिसरे मुल झाले आहे.
त्यांच्या नवजात मुलीच्या जन्माबद्दल माहिती देताना विलियम्सनने सांगितले की 'आणि आता ते तीन झाले आहेत. गोंडस मुली तुझे या जगात स्वागत आहे. तुझ्या सुरक्षित आगमनाबद्दल आनंद आहे आणि तुझ्या पुढील प्रवासासाठी उत्सुक आहे.'
दरम्यान, त्याच्या मुलीच्या जन्मासाठी विलियम्सनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच पार पडलेल्या टी20 मालिकेदरम्यान सुटी घेतली होती. पण तो 29 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार आहे.