Sameer Amunekar
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरपासून जवळ असलेलं कैलास मंदिर पूर्णपणे एका एकसंध खडकातून कोरलेलं आहे, जे स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकलेचं अद्भुत उदाहरण मानलं जातं.
कैलास मंदिर हे जगातील एकमेव मंदिर आहे जे वरून खाली कोरलं गेलं आहे. म्हणजेच सर्वप्रथम कळस कोरला गेला आणि त्यानंतर हळूहळू पाया व भिंती.
मंदिर खोदताना जवळपास २०,००० टन दगड काढला गेला. आजतागायतही या दगडाचं ठिकाण नेमकं कुठे आहे हे कोडंच आहे.
भारतातील अनेक लेण्यांप्रमाणे समोरून किंवा खालून वर कोरलेली नसून, ही लेणी अगदी उलट रचनेनुसार कोरलेली आहे – ज्यामुळे ती इतरांपेक्षा खास ठरते.
हे मंदिर फक्त भव्यतेसाठी नव्हे तर कलात्मकतेसाठीही प्रसिद्ध आहे. शंकराच्या विविध रूपांपासून ते रामायण-महाभारतावर आधारित कोरीव काम मंदिरात पाहायला मिळतं.
इतकं मोठं काम कोणत्या साधनांनी आणि किती कालावधीत पूर्ण केलं गेलं. याचा आजही इतिहासकारांमध्ये संभ्रम आहे.
एलोरा लेण्यांमधील हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत अग्रक्रमावर आहे. छत्रपती संभाजीनगरपासून काही अंतरावर असलेलं हे ठिकाण आज हजारो पर्यटकांचं आकर्षण आहे.