Sameer Amunekar
डोळे वर-खाली, डावीकडे-उजवीकडे आणि गोल फिरवण्याचा व्यायाम डोळ्यांच्या स्नायूंना बळकट करतो.
प्रत्येक २० मिनिटांनी २० फूट दूरवरच्या एखाद्या वस्तूकडे २० सेकंद पाहणे. स्क्रीन टाईममुळे होणाऱ्या दृष्टीदोषांपासून वाचवतो.
दोन्ही हात चोळून गरम करून डोळ्यांवर हलक्या हाताने ठेवल्यास डोळ्यांना विश्रांती आणि उष्णतेमुळे आराम मिळतो.
एखादी वस्तू हळूहळू हलवून डोळ्यांनी तिचा मागोवा घेणे. फोकसिंग क्षमता वाढवते.
१५-२० वेळा सलग डोळे मिचकावल्याने डोळे ओले राहतात आणि ड्रायनेस टाळता येतो.
सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशात काही क्षण डोळे बंद ठेवून उभे राहिल्यास डोळ्यांना नैसर्गिक ऊर्जा मिळते. (फक्त सकाळीच करावे.)
डोळ्यांसाठी योग्य जीवनसत्त्वे (Vitamin A, C, E) असलेला आहार आणि पुरेशी झोप – यामुळे दृष्टी सुधारते आणि चष्मा लागण्याचा धोका कमी होतो.