Manish Jadhav
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची रंगत वाढत चालली आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात घातक गोलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावातही कागिसो रबाडाची जादू दिसून आली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची त्याने पळताभुई थोडी केली.
दुसऱ्या डावात एकाच षटकात रबाडाने उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. एवढचं नाहीतर दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने कांगारुंचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अॅलेक्स कॅरी आऊट केले.
दुसऱ्या डावात 3 विकेट घेऊन रबाडाने दिग्गजांच्या खास क्लबमध्ये एन्ट्री केली. या प्रोटीज गोलंदाजाने जॅक कॅलिसला मागे सोडले.
दुसऱ्या डावात तीन विकेट घेऊन रबाडाने तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप पाच गोलंदाजांपैकी एक बनला. या बाबतीत त्याने जॅक कॅलिसला मागे टाकले.
रबाडाच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 574 विकेट्स झाल्या. त्याचवेळी, कॅलिसने त्याच्या कारकिर्दीत 572 विकेट घेतल्या होत्या. रबाडाने ही कामगिरी 242 सामन्यांमध्ये केली.
दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शॉन पोलॉकच्या नावावर आहे, ज्याने 414 सामन्यांमध्ये एकूण 823 विकेट घेतल्या आहेत. रबाडाची त्या दिशेने वाटचाल सुरु आहे.