Manish Jadhav
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 19 ऑगस्टपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होत आहे.
या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज कगिसो रबाडा भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिर यांना मागे टाकण्याची शक्यता आहे.
विक्रम मोडण्यासाठी रबाडाला आता फक्त 6 विकेट्सची गरज आहे.
इरफान पठाणने 123 एकदिवसीय सामन्यांत 173 विकेट्स घेतल्या आहेत, तर इम्रान ताहिरने 107 सामन्यांत 173 विकेट्स घेतल्या आहेत.
कगिसो रबाडाने आतापर्यंत 106 एकदिवसीय सामन्यांमध्ये 168 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो या दोघांच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत रबाडाने 5 विकेट्स घेतल्या होत्या, त्यामुळे त्याचा फॉर्म चांगला असल्याचे दिसून येत आहे.
रबाडाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी 16 धावांत 6 विकेट्स घेण्याची आहे. त्याची गोलंदाजी सरासरी 27.45 इतकी प्रभावी आहे.
ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली असल्यामुळे आता एकदिवसीय मालिकेत जोरदार पुनरागमन करुन मालिका जिंकण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल.