प्रतिक्षा संपली! फुलांचे नंदनवन तुमची वाट पाहते आहे, आजच बुकिंग करा..

गोमन्तक डिजिटल टीम

कास पठार

पावसाचे प्रमाण कमी झाले असून कास पठारावर वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे.

Kaas Plateau

पर्यटकांचे आवडते ठिकाण

Valley of Flowers म्हणुन पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेले सातारा (Satara) जिल्ह्यातील कास पठाराकडे आता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

Kaas Plateau

फुलांचे नंदनवन

६५० जातींची फुलं आपल्याला कास पठारावर बघायला मिळतात. त्यापैकी ३० प्रजातींची फुलं फक्त इथेच बघायला मिळू शकतात.

Kaas Plateau

जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ

हे पठार जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ (World Natural Heritage Site) म्हणून घोषित केले गेले आहे.

Kaas Plateau

तीन बॅचेस

इथे भेट देण्यासाठी दिवसभरातून तीन बॅचेसमध्ये प्रत्येकी १००० पर्यटकांना आत सोडण्यात येते.

Kaas Plateau

बुकिंग

कास पठाराला भेट देण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बुकिंग स्वीकारले जाते. १२ वर्षांखालील मुलांना तिकीट नाही.

Kaas Plateau

विद्यार्थ्यांसाठी सवलत

सोमवार ते शुक्रवार विद्यार्थी आपल्या शाळा कॉलेजचे पत्र दाखवून प्रति व्यक्ती ₹४० याप्रमाणे लाभ घेऊ शकतात. शनिवार व रविवारी ही सवलत नाही.

Kaas Plateau

इतर ठिकाणे

कास-कुमुदिनी तलाव, वासोटा, अजिंक्यतारा, सज्जनगड, तापोळा, कोयना अभयारण्य, वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा, महाबळेश्वर-पाचगणी ही ठिकाणे आपण बघू शकता.

Kaas Plateau
Plateau
आणखी पाहा