गोमन्तक डिजिटल टीम
मध्य प्रदेशात धर्मापासून राजकारणापर्यंत वावर असणारे महामंडलेश्वर स्वामी वैरागानंद गिरी उर्फ मिर्ची बाबा पुन्हा चर्चेत आले आहेत. एका महिला भक्तावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भोपाळ मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या मिर्ची बाबावर इतर कैद्यांनी हल्ला करून जखमी केले.
23 मे रोजी टीव्ही चॅनल बदलण्याच्या वादातून मिर्ची बाबावर इतर कैद्यांनी हल्ला केला होता. मिर्ची बाबाला तुरुंगात भेटायला गेल्यावर या हल्ल्याची माहिती मिळाल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. मिर्ची बाबांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे.
मिर्ची बाबाचे खरे नाव राकेश दुबे असे आहे. राकेश दुबे 1997 पर्यंत तेल मिलमध्ये मजूर म्हणून काम करत होते. राकेश दुबे यांनी अहमदाबादमध्येच एका साधूच्या संगतीत आल्यानंतर संन्यास घेतला आणि आपले नाव बदलून वैरागानंद गिरी असे ठेवले.
स्वामी वैरागानंद गिरी यांनी आपल्या भक्तांना मिर्ची धुरी देत असत त्यामुळे लोक हळूहळू त्यांना मिर्ची बाबा म्हणू लागले.
कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये मिर्ची बाबा यांना महामंडळाचे अध्यक्ष बनवून राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. मिर्ची बाबांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ लोकसभा मतदारसंघातून दिग्विजय यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एका महिलेने मिर्ची बाबाविरुद्ध भोपाळमधील पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मिर्ची बाबाने आपल्या आश्रमात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता.
स्मृती इराणी मंदिरात पूजा करतात, तर त्यांची मुलगी गोमांस विकण्याचा परवाना घेऊन गोव्यात फिरत असल्याचे विधान मिर्ची बाबांनी केले होते.
मिर्ची बाबा जरी कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्ये निकटवर्तीय मानले जात असले तरी त्यांनी भाजप नेत्यांशीही चांगले संबंध निर्माण केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.